top of page
Shegaon Flyer copy.png
WhatsApp Audio 2026-01-30 at 7.23.47 PM

श्री गजानन महाराजांच्या पावन चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या शेगांव या पुण्यभूमीत आयोजित-

‘गण गण गणत बोते – प्रत्यक्ष साक्षात्कार शिबिर’!


शेगांव — श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आता एका गहन आध्यात्मिक संगमाचे द्वार उघडत आहे. येथे शेगांवमधील उच्च भक्तीची ऊर्जा आणि सत्गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजी यांच्या चैतन्यप्रवाहाचा दिव्य संगम घडणार आहे. या आध्यात्मिक ऊर्जेचे माध्यम बनून स्वामीजी साधकांना प्रत्यक्ष अनुभूती प्रदान करणार आहेत.

11.png

या शिबिरात काय विशेष अपेक्षित आहे?-

01

चैतन्यप्रवाह- 

परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी हे दिव्य ऊर्जेचे सजीव माध्यम आहेत. त्यांच्या वाणीमध्ये व सान्निध्यात चैतन्याचा अखंड प्रवाह अनुभवास येतो. हा प्रवाह शिबिरार्थींना आत्मसाक्षात्काराच्या दुर्लभ अनुभूतीपर्यंत पोहोचवू शकतो.

02

सोप्या भाषेत गहन प्रवचन-

स्वामीजी कुंडलिनीशक्ती, आभामंडल, वैचारिक प्रदूषण यांसारख्या गूढ विषयांचे विवेचन अत्यंत सोप्या व सहज शब्दांत करतात, जे सामान्य व्यक्तीलाही सहज समजते.

03

सामूहिकतेचे महत्त्व-

“हजारो साधकांसह एक दिवस ध्यान करणे आणि एकट्याने हजारो दिवस ध्यान करणे — हे समान फलदायी आहे.”
या विराट सामूहिक ऊर्जेच्या सान्निध्यात साधकाला विचारशून्य अवस्था सहज प्राप्त होते.

04

परीपूर्ण आध्यात्मिक वातावरण- 

या शिबिरात होणारी प्रवचने, ध्यानसाधना व प्रश्नोत्तर सत्रे साधकांच्या जीवनात नवचैतन्याचा संचार घडवून आणतात.

05

सुलभता-

स्वामीजी सांगतात की ज्या प्रकारे वायू, जल व सूर्यप्रकाश हे निसर्गाकडून नि:शुल्क मिळतात, त्याचप्रमाणे आध्यात्मिक ज्ञानालाही कोणतेही मूल्य नाही, ते अमूल्य आहे. म्हणूनच हे शिबिर सर्वांसाठी पूर्णतः नि:शुल्क खुले आहे.

AKP_3745.JPG

‘शेगांव अनुभव’ सार- 

गण गण गणत बोते – प्रत्यक्ष साक्षात्कार महाशिबिर’ हे श्री गजानन महाराजांच्या शिकवणीचे सजीव प्रकटन आहे.

श्री गजानन महाराज समाधी मंदिराच्या भक्तिमय वातावरणात आणि स्वामीजींच्या हिमालयीन ध्यानयोग संस्कारांच्या संगमातून आत्म्यातील दिव्य ऊर्जेचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्याची ही एक अद्वितीय संधी आहे.
येथून आपण केवळ शांतीच नव्हे, तर परिपूर्ण जीवनाचा मार्ग, समाधान आणि स्वधर्माचे ज्ञान घेऊनच परताल ही आम्हाला खात्री आहे.

Aatma Devo Bhava

Contact Us

support@gurutattva.org

helpline. 7666025555
IVR. 123-456-7890

© 2035 by Shree Shivkrupananad Swami Foundation

end3.png
bottom of page